Advertisement

लोकल सुरू न केल्यास सविनय कायदेभंग, मनसेचा इशारा

रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे.

लोकल सुरू न केल्यास सविनय कायदेभंग,  मनसेचा इशारा
SHARES

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने अद्यापही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, बससेवा सुरू असल्याने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी, कोविड संदर्भातील कोणत्याच नियमांचे बसच्या प्रवासात होताना दिसत नाही. बसमध्ये प्रचंड गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे.

बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नोकरदारांना प्रवास करता यावा याकरता रेल्वे आणि मेट्रो सेवा वगळता सर्व सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यात आल्या आहेत.

तोच धागा पकडून देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात प्रवासी एकमेकांना खेटून उभे राहिलेले दिसतात. बसच्या दरवाजावरही लोक उभे असलेले दिसतात. बस वाहकही हतबल झालेले यातून दिसत आहे. ‘बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का,’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.


हेही वाचा

रशिया देणार भारताला कोरोना वॅक्सीनचे १०० दशलक्ष डोस

कोरोनामुळे ६४ डॉक्टर्स, १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पण IMAची आकडेवारी वेगळी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा