Advertisement

उद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे


उद्धव यांच्या स्पर्शात बाळासाहेब जाणवले- शिशिर शिंदे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे यांनी अखेर मनसेला रामराम ठोकत मंगळवारी शिवसेनेत घरवापसी केली. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिशिर शिंदे यांनी हाती शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा, त्यांच्यासोबत असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशिर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांच्या घरवापसीमुळे राज यांना धक्का बसला आहे. सोमवारी मनसेच्या जाहीर झालेल्या कार्यकारिणीतूनही शिशिर यांचं नाव वगळण्यात आलं होतं.



काय म्हणाले शिशिर?

मातोश्रीवर जाऊन मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्यात भावपूर्ण संवाद झाला. त्यांचा निरोप घेऊन परतत असताना जेव्हा मी त्यांचा हात हातात घेतला तेव्हा मला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श जाणवला.



भगवा अन् धोंडा

मी १७ वर्षांचा असताना एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात धोंडा घेतला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा माझ्या खांद्यावर भगवा दिला. त्यामुळे या भगव्याचा आदर करून मी शिवसेनेचा भगवा जोपर्यंत विधानसभेवर फडकवणार नाही, तोपर्यंत मातीला पाठ लावणार नाही.


मोठ्या मनाने माफ करा

मी बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली आलो आहे. तुम्हा शिवसैनिकांमध्ये आलो आहे. यापूर्वी काही बोललो असेल, तर शिवसैनिकांची माफी मागतो. मोठ्या मनाने तुम्ही मला माफ करून मला आपला करावं, असं आवाहन शिंदे यांनी केलं.



हेही वाचा-

शिवसेनेला हवंय मुख्यमंत्रीपद! बंद दाराआडची खेळी

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा