Advertisement

मुंबईचे डबेवाले आव्हाडांवर नाराज

आव्हाड यांनी वादग्रस्त विधान असलेला व्हिडिओ फेसबुकवरून हटवला असला, तरी वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या मुंबई डबेवाल्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तुकाराम महाराजांबाबत असं बोलण्याचे धाडस त्यांनी केलंच कसं? या वक्तव्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा कमी असल्याची प्रतिक्रिया डबेवाल्यांनी दिली.

मुंबईचे डबेवाले आव्हाडांवर नाराज
SHARES

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाल्याचं वक्तव्य करून वारकऱ्यांचा संताप ओढावून घेणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंबईचे डबेवाले देखील नाराज झाले आहेत.

आव्हाड यांनी वादग्रस्त विधान असलेला व्हिडिओ फेसबुकवरून हटवला असला, तरी वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या मुंबई डबेवाल्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तुकाराम महाराजांबाबत असं बोलण्याचे धाडस त्यांनी केलंच कसं? या वक्तव्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा कमी असल्याची प्रतिक्रिया डबेवाल्यांनी दिली.भावना दुखावल्या

मुंबई शहर उपनगरात डबे पोहोचवणारे देहू-आळंदीच्या पंचक्रोशीतले आहेत. डबेवाल्यांच्या घरात वारीची परंपरा आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांनी दिलेली शिकवण डबेवाले आचरणात आणतात. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यांने आम्हाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले.


एका दिवसात काय बदल?

भिडे गुरूजी बोलले, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू एक पाऊल पुढे होता. त्याच्या या विचारांशी आम्ही सहमत नाही. या विधानावर जितेंद्र आव्हाडांची काय प्रतिक्रिया होती ती आपण सर्वांना पाहिली. मग २ दिवसात त्यांच्या विचारात असा काय बदल झाला की ते संत तुकाराम महाराजांबद्दल असं बोलू लागले हे काही कळत नाही, असंही तळेकर म्हणाले.हेही वाचा-

डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटने नेदरलॅण्डची राणी खूश!

आंबाविक्रीची स्मार्ट आयडिया! शेतकरी-मुंबईचे डबेवाले आले एकत्रRead this story in English
संबंधित विषय
Advertisement