Advertisement

'मोदीजी माफी मांगो' मुंबईत कॉंग्रेसचे आंदोलन सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेस आक्रमक झाली असून, पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे.

'मोदीजी माफी मांगो' मुंबईत कॉंग्रेसचे आंदोलन सुरू
SHARES

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेस आक्रमक झाली असून, पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन केलं जात आहे. दक्षिण मुंबईतील मंत्रालय परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कॉग्रेसचे आंदोलन सुरू आहे. नाना पटोले, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित आहेत.

मंत्रालया परिसरात ज्याठिकाणी कॉंग्रेसचे आंदोलन सुरू आहे. याठिकाणीच भारतीय जनता पार्टी पक्षाचं मुख्य कार्यालय आहे. दरम्यान, बुधवारी पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांनी राज्यभरातील भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणा असल्याचं म्हटलं होते. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा