राणे जाणार कुठल्या पक्षात? पुढच्या १० दिवसांत सांगणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर राणे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर राणे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात राणे यांनी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. मी भाजपात जाईन की स्वत:चा पक्ष चालवेन याचा निर्णय पुढच्या १० दिवसांत घेईन, असं राणे यांनी स्पष्ट केलं आहे. 

शिवसेना नाराज

काँग्रेसमधून बाहेर पडलेले राणे यांचा कोकणात अजूनही दबदबा कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुखांवर सातत्याने शेलक्या शब्दांत टीका करणाऱ्या राणे यांना भाजपात प्रवेश देऊ नये म्हणून शिवसेना सातत्याने भाजपावर दबाव टाकत आहे. अशा परिस्थितीत भाजपाने राणेंना पक्षात घेतलंच तर शिवसेना नाराज होऊ शकते.

भाजपाच्या कोट्यातून खासदार

नारायण राणे सध्या भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची स्थापना केली आहे. राणे यांचे चिरंजीव नितेश राणे अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत. तर निलेश राणे लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते.

आता कुठल्या पक्षात?

राणे यांनी २००५ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी ते शिवसेनेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेतून काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर पडत स्वत:चा पक्ष स्थापन करणारे राणे आता कुठल्या पक्षात प्रवेश करतील, याची उत्सुकता त्यांच्या पाठिराख्यांना नक्कीच असेल.हेही वाचा- 

तर, उद्धव मातोश्री सोडून गेले असते, राणेंच्या आत्मचरित्रातला गौप्यस्फोट

आदित्य विधानसभा लढवण्याचे संकेत, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहणार नजर

संबंधित विषय
ताज्या बातम्या