राष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला!

गणेश नाईक यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे कोकणातील प्रमुख नेते भास्कर जाधव यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे. भास्कर जाधव यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला!
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याची काही चिन्हे नाहीत. गणेश नाईक यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे कोकणातील प्रमुख नेते भास्कर जाधव यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे. भास्कर जाधव यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. जाधव हे मूळचे शिवसैनिक आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली होती.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर भास्कर जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना जाधव म्हणाले की,  माझा राष्ट्रवादीत कोणाशीही वाद नाही. मी मूळचा शिवसैनिक आहे. मी गेली काही वर्ष राष्ट्रवादीत असलो तरी माझा आंतरात्मा शिवसेनेतच होता. भास्कर जाधव यांनी शुक्रवारी सकाळीच आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. जाधव यांच्या प्रवेशाने शिवसेना कोकणात आणखी भक्कम होणार आहे. तर  राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठा फटका बसणार आहे. 

१५ वर्षांपूर्वी शिवसेना सोडून भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने त्यांना अनेक महत्त्वाची पदे दिली होती. आघाडी सरकारच्या काळात ते मंत्रीही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीपासून दूरच होते. ते शिवसेनेता प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. हेही वाचा - 

सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...

उदयनराजेंची नाराजी दूर? शरद पवारांशी केली २ तास चर्चा
संबंधित विषय