Advertisement

चेंबूरमध्ये निघाली दुचाकींची प्रेतयात्रा!


चेंबूरमध्ये निघाली दुचाकींची प्रेतयात्रा!
SHARES

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पांजरापोळ सर्कल, चेंबूर इथं आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान पेट्रोल दरवाढीनंतर ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत कार्यकर्त्यांनी पंजाबवाडी येथील पेट्रोल पंपावर साखर वाटून सरकारचा निषेध केला. त्यां

पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे दुचाकीचा काही उपयोग राहिला नसल्याचं सांगत नवाब मलिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीची प्रेतयात्रा काढली तसंच वाहनांची शोकसभाही भरवली.



इंधनाचे दर 'जीएसटी'त का नाही?

कर्नाटक निवडणुकीनंतर इंधनाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर आकारून सरकार जनतेची लूट करत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षात अाणू, असं आश्वासन देतात मात्र ठोस निर्णय घेत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या हातात काहीही नाही म्हणत निर्णय घेण्याचं टाळतात. जीएसटी काऊंसिलमध्येही भाजपाचं बहुमत आहे तरी हा निर्णय का घेतला जात नाही? असा सवाल नवाब मलिक यांनी केला.


तोपर्यंत आंदोलन सुरूच

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी फक्त एक पैशांची घट झाली आहे. एक पैसा कमी करून सरकार जनतेला भीक देत आहे का? असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला. जोपर्यत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.



हेही वाचा-

पेट्रोल झालं स्वस्त, फक्त एक पैशानं!

जीवनावश्यक वस्तू महागणार! मालवाहतूकदारांची २० टक्के दरवाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा