Advertisement

माझ्या नावावर कुणीतरी अशी बिल्डिंग करावी- शरद पवार

'माझी पण इच्छा आहे की, माझ्या कुणीतर माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिने केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली.

माझ्या नावावर कुणीतरी अशी बिल्डिंग करावी- शरद पवार
SHARES

'माझी पण इच्छा आहे की, माझ्या कुणीतर माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिने केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली. शिवाय अर्थात जे कोणी बोलत आहे, त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा करावी का? असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला. (ncp chief sharad pawar slams kangana ranaut over false allegations)

साधारणत: दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना रणौतला फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावल्याचं सांगण्यात येत होतं. फ्लॅटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन होत असल्याचं या नोटिशीत नमूद असल्याची चर्चा सुरू असताना महापालिकेने फ्लॅटला नाही, तर संपूर्ण इमारतीला नोटीस पाठवल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. 

त्यावर कंगनाने एक ट्विट देखील केलं. परंतु या ट्विटमध्ये तिने चक्क शरद पवार यांचं नाव घेतलं. आपल्या ट्विटमध्ये तिने असं म्हटलं आहे की, ही नोटीस मला नव्हे, तर संपूर्ण इमारतीला बजावण्यात आली होती. त्यामुळे हा प्रश्न एकट्या माझ्या नाही, तर संपूर्ण इमारतीचा आहे. ही इमारत शरद पवार यांची आहे आणि आम्ही त्यांच्या पार्टनरकडून हा फ्लॅट विकत घेतलेला आहे. त्यामुळे त्या बांधकाम व्यावसायिकाने यावर पुढं येऊन उत्तर देण्याची गरज आहे. 

हेही वाचा - “कोरोनाशी लढायचं होतं, कंगनाशी नाही”

This was not just to me but to entire building and this is not my flat issue but a building issue which builder needs to deal with and this building belongs to Sharad Pawar we bought the flat from his partner so he is answerable for this not me..

Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाचं नाव न घेता, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, असं ट्विट करत कंगनाच्या आरोपांना उत्तर दिलं. 

त्यावर शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, पवारांनी कंगनाने केलेल्या आरोपांची खिल्ली, तर उडवलीच, पण सोबतच तिच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 

हेही वाचा - कंगनाच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओची होणार चौकशी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा