Advertisement

शरद पवार उद्यापासून कोकण दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवार ९ जून २०२० पासून निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत.

शरद पवार उद्यापासून कोकण दौऱ्यावर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवार ९ जून २०२० पासून निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसांचा (ncp chief sharad pawar to visit raigad and konkan after cyclone nisarga) दौरा करणार आहेत. चक्रीवादळामुळे कोकणातील सार्वजनिक मालमत्तेसह सर्वसामान्यांची घरे, बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी शरद पवार करणार आहेत. 

‘असा’ असेल कार्यक्रम

शरद पवार ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतून आपल्या वाहनाने कोकणच्या दिशेने निघतील. सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन इथं आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होतील. 

१० जून रोजी शरद पवार रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करून विविध ठिकाणी भेट देतील. त्यात सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करतील. शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतील. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहतील.  

हेही वाचा- म्हणून शरद पवार गेले मातोश्रीवर, त्यांनीच केला खुलासा…

तातडीची मदत जाहीर 

निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करून १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या मदतनिधीसंदर्भात चर्चा देखील झाली होती. त्यापाठोपाठ रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.  

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य निर्देश दिले.

हेही वाचा- भारतातील रियल इस्टेट कोसळण्याच्या स्थितीत, शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा