Advertisement

भुजबळांना पुन्हा करायचंय मतदान!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा विधानभवनात यायचं आहे. सभागृह गाजवायला नव्हे, तर विधानपरिषद पोट निवडणुकीसाठी मतदान करायला. तब्बल दीड वर्षांनंतर तुरूंगातून बाहेर पडत राष्ट्रपती निवडणुकी दरम्यान भुजबळ यांनी याअगोदर विधीमंडळात पाऊल ठेवलं होतं.

भुजबळांना पुन्हा करायचंय मतदान!
SHARES

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीप्रकरणी सध्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा विधानभवनात यायचं आहे. सभागृह गाजवायला नव्हे, तर विधानपरिषद पोट निवडणुकीसाठी मतदान करायला. तब्बल दीड वर्षांनंतर तुरूंगातून बाहेर पडत राष्ट्रपती निवडणुकी दरम्यान भुजबळ यांनी याअगोदर विधीमंडळात पाऊल ठेवलं होतं.


पोटनिवडणूक कुठल्या जागेची?

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. राणेंच्या या रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबरला मतदान होत आहे. या मतदानासाठी भुजबळ यांना बाहेर यायचं आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांत भुजबळ न्यायालयात विंनती अर्ज करणार असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.


याआधी मिळाली होती परवानगी

याआधी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधीमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती छगन भुजबळ यांनी 'प्रिव्हेंशन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट' (पीएमएलए) न्यायालयाला केली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रपती निवडणुकीला मतदान करण्याची परवानगी मिळाली होती.


'या' कारणांमुळे भुजबळ तुरूंगात

महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणांत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावलं होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. १४ मार्च २०१६ रोजी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर 'ईडी'ने भुजबळांना अटक केली.हेही वाचा-

छगन भुजबळ यांना जेलमध्ये पंचतारांकित सुविधा - अंजली दमानियांचा आरोप

नाशिक जिल्हा बँकेला निधी द्या, छगन भुजबळ यांचे पणनमंत्र्यांना पत्र


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा