Advertisement

आरे कारशेडचा निर्णय का बदलला? फडणवीसांचा सरकारवर पुन्हा हल्ला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेडच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं.

आरे कारशेडचा निर्णय का बदलला? फडणवीसांचा सरकारवर पुन्हा हल्ला
SHARES

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आरे कारशेडच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं. आरे कारशेडचा निर्णय का बदलला? यातून काय साध्य होणार? किती काळ जाणार? आणि किती मोठं नुकसान होणार? असे एक ना अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.

ठाकरे सरकारने पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून आरेमधील मेट्रो कारशेड (mumbai metro) कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. यावरून भाजप नेत्यांकडून सरकारवर बरीच टीका करण्यात आली. परंतु या टीकेला न जुमानता ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देऊन तिथं मेट्रो ३ आणि मेट्रो ६ अशा दोन्ही मार्गांसाठी कारशेड उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. 

परंतु कांजूरमार्गमधील १०२ एकर जागेवर मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू झालेलं असताना केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. ‘डीपीआयआयटी’ने राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं. तर राज्य सरकारने हा दावा खोडून काढत काम सुरूच ठेवलं.

हेही वाचा- “आरे कारशेडसाठी फक्त ७० कोटी खर्च, फडणवीसजी उरलेले ३३० कोटी रुपये कुठं गेले?”

त्यावर भाष्य करताना, आमच्या काळात जी कामे सुरू झाली, ते प्रकल्प आजही वेळेत पूर्ण होऊ शकतात. पण त्यात अडचणी आणल्या जातात. असे निर्णय महाराष्ट्राला मागे नेणारे आहेत. आरे कारशेडचा निर्णय का बदलला? काय साध्य होणार? किती काळ जाणार? 

आणि किती मोठे नुकसान होणार? आरे कारशेडचा (aarey) प्रश्न हा तुमच्या-माझ्या इभ्रतीचा नाही. हा मुंबईकरांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे. सरकारने मुंबईवर सूड उगवू नये, एवढीच माझी विनंती आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्याआधी, आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग (kanjurmarg) इथं हलविण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी आणि अहंकारातून घेतलेला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असं याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. जी मेट्रो रेल्वे पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असती, तो प्रकल्प आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत. सरकारने कारशेडच्या कामावर लावलेल्या स्थगितीमुळे १३०० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. शिवाय कारशेड हलवल्यामुळे ४ हजार कोटींचा वाढीव भार सरकारच्या तिजोरीवर पाडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

(opposition leader devendra fadnavis ask question on aarey car shed to thackeray government)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा