Advertisement

मेट्रो कारशेडच्या नावाखाली निव्वळ पोरखेळ- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारचे सल्लागार नेमके कोण आहेत, हे समजत नाही, जे राज्य आणि केंद्र सरकारलाही बुडवायला निघाले आहेत, असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मेट्रो कारशेडच्या नावाखाली निव्वळ पोरखेळ- देवेंद्र फडणवीस
SHARES

मेट्रो ३ ची कारशेड वादग्रस्त कांजूरमार्गच्या जागेऐवजी वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर हलविण्याबाबत राज्य सरकारने चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सरकारला कुणीतरी चुकीचे सल्ले देत असून हा निव्वळ पोरखेळ चालला आहे. राज्य सरकारचे सल्लागार नेमके कोण आहेत, हे समजत नाही, जे राज्य आणि केंद्र सरकारलाही बुडवायला निघाले आहेत, असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे.

कारशेडसाठी बीकेसीतील जागेच्या पर्यायावर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित जागेवर राज्य सरकारने कारशेड उभारण्याचा सुरू केलेला विचार पूर्णपणे अव्यवहार्य आहे. येथील बुलेट ट्रेनचं स्थानक हे भुयारी असून त्यासाठी जमिनीवर केवळ ५०० मीटर जागा वापरण्यात येणार आहे, शिवाय तिथं एक आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची इमारतही उभारण्यात येईल. बीकेसीत कारशेड उभारायचं झाल्यास किमान २५ हेक्टर मोकळी जागा लागेल. अशी एकत्रित जागा बीकेसीत (bkc) मिळणं शक्य नाही, मिळालीच तर बाजारभावानुसार या जागेसाठी एमएमआरडीएला २० हजार कोटी रुपये तरी द्यावे लागतील. शिवाय भूमिगत कारशेडच्या देखभालीचा खर्च देखील जमिनीवरील कारशेडच्या किमान पाचपट असेल.

हेही वाचा- ‘हे’ तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!!- भाजप

तेव्हा असे अव्यवहार्य सल्ले राज्य सरकारला नेमकं कोण देत आहे, हे समजायला मार्ग नाही. मात्र या चुकीच्या सल्ल्यांमुळे पोरखेळ मात्र नक्कीच सुरू आहे. यातून मुंबईकरांना मेट्रोपासून (mumbai metro) वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तर भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी देखील याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं. मेट्रो ट्रेनला गिरगावात विरोध, मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे, तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर.. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच! आता मेट्रो कारशेड उभारण्या पेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव आखला जातोय.

मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक आहेत. मेट्रो कारशेड बीकेसीत प्रस्तावित करणे “शिवसेनेचा (shiv sena) हा रडिचा डाव आहे”,तो मुंबईच्या “विकासाच्या नरडीचा घाव घेणारा ठरेल, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला.

(opposition leader devendra fadnavis slams maharashtra government over mumbai metro car shed and bullet train proposed land in bkc)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा