Advertisement

पहारेकरीच चोरी करायला लागले, राफेलवरून उद्धव ठाकरेंचं मोदींवर शरसंधान

जीवाची पर्वा न करता देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैन्यदलाच्या विमान खरेदीत घोटाळा होतो. पंतप्रधानांवर आरोप होताे, त्यांना प्रश्न केले जातात. तरीही या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीनचीट मिळाली असली, तरी अनुभव नसलेल्या कंपनीची निवड का करण्यात आली? यासारख्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पहारेकरीच चोरी करत असल्याचा टोला भाजपाला लगावला.

पहारेकरीच चोरी करायला लागले, राफेलवरून उद्धव ठाकरेंचं मोदींवर शरसंधान
SHARES

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं भाजपा सरकारला क्लीनचीट दिली आहे. असं असलं तरी काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून भाजपाला राफेल घोटाळ्यावरून घेरलं जात आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राफेलप्रकरणी टीका करत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंढरपूरच्या महासभेत सरसंधान साधलं.


उत्तरं द्यावीच लागतील

जीवाची पर्वा न करता देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैन्यदलाच्या विमान खरेदीत घोटाळा होतो. पंतप्रधानांवर आरोप होताे, त्यांना प्रश्न केले जातात. तरीही या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीनचीट मिळाली असली, तरी अनुभव नसलेल्या कंपनीची निवड का करण्यात आली? यासारख्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पहारेकरीच चोरी करत असल्याचा टोला भाजपाला लगावला.


टीकेचे बाण

राम मंदिराचा मुद्दा उचलत उद्धव ठाकरे यांनी चलो आयोध्यानंतर आता चलो पंढरपूर अशी हाक दिली. सोमवारी चंद्रभागेच्या तिरी त्यांची महासभा पार पडली. या महासभेत अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी भाजपाला, पंतप्रधानांना पुन्हा लक्ष्य केलं. राम मंदिर, राफेल, पीकविमा योजना, शस्त्रखरेदी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अशा एक ना अनेक मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर-मोदींवर टीकेचे बाण सोडले.


हिम्मत फक्त शिवसेनेत

चंद्रभागेच्या मैदानावर सभा घेण्याची हिम्मत कुणाचीही नसते असं म्हटलं जातं. पण ही हिम्मत फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच असून आज हे शिवसेनेनं दाखवून दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करत ५ राज्यांतील निवडणुकांवरून भाजपाला टोल्यांवर टोले लगावले. सोलापूरच्या बाजार समितीच्या निवडणुका असो वा न्यूयाॅर्कमधील निवडणुका, आम्ही जिंकू असा आत्मविश्वास ज्यांना होतं त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या ५ राज्यांच्या निकालांनी उडवून लावल्या.


आधी घाण साफ करू

पर्याय कोण याचा विचार न करता आधी घाण साफ करू, असं म्हणत ३ राज्यांत भाजपाला पराभूत केलं. तर इतर दोन राज्यांच्या निकालांनी प्रादेशिक पक्ष किती भक्कम असतात, राष्ट्रीय पक्षांना कधी धूळ चारू शकतात हे दाखवून दिलं. आता हीच हिम्मत महाराष्ट्रानं दाखवावी, प्रादेशिक पक्षाची ताकद दाखवावी, असं आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं.


राज्यात भगवाच

भाजपाकडून युतीसाठी प्रयत्न होत असून ५०-५० चा फाॅम्युर्लाही दिला जात आहे. हा फाॅम्युर्ला उद्धव ठाकरे स्वीकारणार का, युतीबद्दल ते पंढरपूरच्या सभेत काय बोलणार याकडेच सर्वांच लक्ष लागलं होतं. पण पंढरपूरच्या सभेच्या भाषणाची सुरूवातच उद्धव ठाकरे यांनी भाजपाला निशाणा करत केली आणि शेवटही भाजपावर सरसंधान साधतच केलं. युतीचा निर्णय जनता घेईल, असं म्हणत ५०-५० चा फाॅर्म्युला फेटाळून लावत त्यांनी पुन्हा स्वबळाची भाषा केली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाही तर भाषणाचा शेवट करताना २०१९ ला राज्यात भगवाच फडकेल आणि शिवसेनेचंच राज्य येईल, असंही म्हटलं.



हेही वाचा-

संजय राऊतांनी फेटाळला युतीचा ५०-५० फाॅर्म्युला

चलो पंढरपूर...सोमवारच्या सभेसाठी सेनेकडून जय्यत तयारी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा