Advertisement

वारिस पठाण भुंकणारा कुत्रा - यशवंत किल्लेदार


वारिस पठाण भुंकणारा कुत्रा - यशवंत किल्लेदार
SHARES

गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या मनसे विरुद्ध परप्रांतीय वादात आता एमआयएमने उडी घेतली आहे. त्यामुळे आता मनसे विरुद्ध एमआयएम हा नवा वाद उफाळलाय. नेहमीच चर्चेत असणारे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरच टीका केल्याने मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी तर वारिस पठाण यांना थेट भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली आहे!


'राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया'

'राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया', अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली होती. 'हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो', असे आव्हानही त्यांनी राज ठाकरेंना दिले होते. 'मनसेने जर भायखळ्यात तोडफोड केली, तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याने ते आमच्या भागात येत नाहीत', असे वारिस पठाण म्हणाले. 'मनसेची तोडफोड म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सुरु असलेली धडपड आहे', अशी टीकाही वारिस पठाण यांनी केली होती.


असे भुंकणारे कुत्रे खूप असतात - यशवंत किल्लेदार

वारिस पठाण यांच्या टीकेला मनसेनेही जशास तसे उत्तर दिले आहे. 'आज राज ठाकरेंच्या सभांना, मोर्चांना लाखोंची गर्दी होते, ती म्हणजे बुझा हुआ दिया आहे का? दीड वर्षानंतर निवडणूक आहे, कोण बुझतंय ते कळेल त्याला', असे मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार म्हणाले. तसंच 'वारिस पठाण मूर्ख माणूस आहे, त्याला प्रसिद्धी देण्याची काही गरज नाही. असे भुंकणारे कुत्रे बरेच असतात, हत्ती त्याच्या डौलातच चालतो. कुत्ते भौंकते है हाथी चलता है. तरी देखील माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा आहेत त्याला,' अशी टीकाही त्यांनी केली. वारिस पठाण यांना लॉटरी लागून आमदारकी मिळाल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.हेही वाचा

वेडात मनसे कार्यकर्ते पोहोचले 'कारागृहात'!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा