Advertisement

राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेबांना भारतरत्न द्या, ‘या’ नेत्याची मागणी

​शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे​​​ (shivsena chief bal thackeray) यांना मरणोत्तर भारतरत्न (bharat ratna award) पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया (praveen togadia) यांनी केली आहे.

राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेबांना भारतरत्न द्या, ‘या’ नेत्याची मागणी
SHARES

राम मंदिर आंदोलनात (ram mandir movement) महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (shivsena chief bal thackeray) यांना मरणोत्तर भारतरत्न (bharat ratna award) पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया (praveen togadia) यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टच्या (shree ram janmabhoomi trust) स्थापनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत दिली. त्यापाठोपाठ राम मंदिर आंदोलनात ज्या चार जणांचा महत्त्वाचा सहभाग होता, अशा व्यक्तींचा गौरव केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन करावा, अशी मागणी तोगडियांनी केली.

हेही वाचा- राज ठाकरेंनी 'या' कारणासाठी केलं मोदी सरकारचं कौतुक

नागपूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण तोगडिया म्हणाले, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) हे प्रखर हिंदुत्वादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. राम मंदिर आंदोलनाचं (ram mandir movement) त्यांनीच नेतृत्व केलं होतं. 

केंद्र सरकारने ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्ट स्थापनेची घोषणा करून राम मंदिर बांधण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. याच पार्श्वभूमीवर राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी तोगडिया यांनी केंद्र सरकारकडे केली.

हेही वाचा- शिवसेनेची जागा मनसेला, काँग्रेसचा डाव ओळखा- चंद्रकांत पाटील

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा