पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत १८ ऑक्टोबरला सभा


SHARE

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत येणार आहेत. राज्यभरातील नरेंद्र मोदी यांच्या रॅलीबाबत केद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी शुक्रवारी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारपासून प्रचार रॅलीला सुरूवात केली तसंच, ९ रॅलीला संबोधणार आहेत.    

प्रचार रॅली

१३ ऑक्टोबरला मोदी यांनी भंडारा जिल्ह्यातील जळगाव आणि सकोली मधील प्रचार रॅलीत सहभाग घेतला. त्यानंतर, १६ ऑक्टोबर रोजी अकोला, पनवेल आणि परतुर येथील प्रचारसभेत आणि १७ ऑक्टोबरला पुणे, सातारा आणि परळी येथील प्रचार रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर, शेवटची प्रचार रॅली मुंबईत होणार असून, त्यावेळीही सहभागी होणार आहेत.  

भाजप सरकारवर निशाणा

कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची रविवारी साकीनाका आणि धारावी इथं सभा झाली. राहुल गांध यांनी आपल्या सभेमध्ये भाजप सरकारवर निशाणा साधला. यावेळी 'भाजप सरकारनं केवळ मोठ-मोठ्या उद्योगपतींचंच कर्ज माफ केलं आहे, मात्र शेतकऱ्यांच कर्ज माफ केलेलं नाही', असं म्हटलं.हेही वाचा -

सीएसएमटी परिसरातील वीजपूरवठा अर्धा तास खंडीत

'हिंदू दहशतवाद' या उल्लेखाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी- संबित पात्रासंबंधित विषय
ताज्या बातम्या