Advertisement

२५ रुपये दरानं १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्यसरकारनं दिलासा दिला आहे

२५ रुपये दरानं १० लाख लिटर दूध खरेदी; राज्य सरकारचा निर्णय
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्यसरकारनं दिलासा दिला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लीटर दुधाची २५ रुपये प्रतिलीटर दरानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ४-५ दिवसांत हे संकलन सुरू होणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे २ महिने ही खरेदी सुरू राहणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

कोरोना प्रादुर्भावामुळं राज्यातील दूध व्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. दूध विक्री घटल्यामुळं गावागावात दूध स्वीकारलं जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लीटर दुधापैकी १० लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खासगी बाजारात दुधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलीटरपर्यंत खाली घसरला आहे. 

शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लीटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन २५ रुपये प्रतिलीटर दरानं खरेदी करणार आहे. दुधाची भुकटी करून ती साठवली जाणार असून, नंतर त्याची ऑनलाइन विक्री केली जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 

राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असून, यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळणार आहे. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, असं पवार यांनी म्हटलं. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. दूध पावडर तयार करण्याच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.



हेही वाचा -

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा