Advertisement

एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत? तर सून भाजपमध्येच

खडसे यांच्या प्रवेशामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा झटका बसणार असून त्यांच्यासोबत कोण कोण राष्ट्रवादीत जाणार यावर चर्चा सुरू आहेत.

एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत? तर सून भाजपमध्येच
SHARES

भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने दुय्यम वागणूक मिळत असल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. खडसे येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच ही घोषणा केली आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा झटका बसणार असून त्यांच्यासोबत कोण कोण राष्ट्रवादीत जाणार यावर चर्चा सुरू आहेत.

शिवाय एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधील १० ते १२ आमदार आणि काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पुन्हा निवडणुका घेणं अडचणीच असल्याने या आमदार आणि नेत्यांना हळुहळू पण सर्वांसमक्ष प्रवेश देण्यात येईल, असं सांगत जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. (rohini khadse will also join ncp with eknath khadse)

हेही वाचा- पायाखालचे दगड का निसटताहेत? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोमणा

एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि भाजपाच्या नेत्या रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचं काम करणार आहे. मला विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊनही पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नाही. ज्या व्यक्तीने ४० वर्ष पक्षनिष्ठेने काम केलं त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणं स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

मात्र भाजपाच्या खासदार आणि एकनाथ खडसेंच्या सून खासदार रक्षा खडसे भाजपा सोडणार नाहीत, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. तसंच भुसावळचे आमदार संजय सावकारे हे खडसे समर्थक असले तरी ते देखील सध्या भाजपातच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जयंत पाटील यांच्या घोषणेनंतर मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण केवळ विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या त्रासामुळेच पक्षा सोडत असल्याचं जाहीरपणे सांगितलं. भाजपमध्ये आपण इतर कुणावरही नाराज नसून या काळात केवळ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याशी संपर्क साधल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा