Advertisement

लोकसभा निवडणुकीत रिपाइंला २ जागा द्या - रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एनडीएकडे दोन जागा मागितल्या आहेत. तसंच, 'आम्ही एनडीएसोबत कायम राहणार असून, आम्हाला दोन जागा द्याव्यात', अशी मागणी आठवले यांनी केली आहे

लोकसभा निवडणुकीत रिपाइंला २ जागा द्या - रामदास आठवले
SHARES

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी नुकतंच शिवसेना आणि भाजपामध्ये जागावाटप निश्चित झालं आहे. यामध्ये शिवसेना लोकसभेच्या २३, तर भाजपा २५ जागा लढवणार असल्याची घोषणी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. परंतू या जागावाटपावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आक्षेप घेतला होता. तसंच या चर्चेत आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता, रामदास आठवले यांनी लोकसभेसाठी दोन जागा मागितल्या आहेत. तसंच, 'आम्ही एनडीएसोबत कायम राहणार असून, आम्हाला दोन जागा द्याव्यात', अशी मागणी आठवले यांनी केली आहे. त्यामुळं युतीमध्ये पुन्हा एकदा जागावाटपावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.जागा मिळणार ?

शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिपाइंसाठी सोडावी. यातील एक जागा मुंबईतील असावी आणि दुसरी जागा मुंबईच्या बाहेरची असावी,' अशी मागणी आठवलेंनी केली आहे. तसंच, आमच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य तो तोडगा निघेल, अशी अपेक्षा देखील आता आठवले यांनी व्यक्त केली आहेलोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती झाली असून, जागावाटप देखील निश्चित झाली. मात्र, यूती झाली त्यावेळी रिपाईला विश्वासात न घेतल्यामुळे आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळं आठवलेंच्या मागणीनुसार रिपाईला दोन जागा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


रासपची ५ जागांची मागणी

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं भाजप-सेनेकडे पाच जागांची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी ५ जागा देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रीय समाज पक्षाचा ५ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर महामेळावा आयोजीत केल्याचंही त्यांनी सांगितलं. हेही वाचा -

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार दुसरी एसी लोकल

शिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीचे निकाल रखडणारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा