Advertisement

तर, कंगनाला आरपीआय संरक्षण देईल- रामदास आठवले

कंगना मुंबईत आल्यावर तिला आरपीआय संरक्षण देईल, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.

तर, कंगनाला आरपीआय संरक्षण देईल- रामदास आठवले
SHARES

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली असताना कंगना मुंबईत आल्यावर तिला आरपीआय संरक्षण देईल, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. (rpi will provide security to bollywood actress kangana ranaut says minister of state for social justice ramdas athawale)

लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचं मत मांडण्याचा आणि  मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही. कंगना राणावतला आरपीआय संरक्षण देईल, असं म्हणत रामदास आठवले यांनी शिवसेनेलाही मवाळ भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

कंगनाकडे कुठले पुरावे असतील, तर तिने केवळ सोशल मीडियावर व्यक्त न होता पोलिसांना पुरावे द्यावेत. तसंच कंगनाला मुंबईत इतकंच असुरक्षित वाटत असेल, तर तिने मुंबईत परत येऊ नये, असंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुचवलं होतं.

हेही वाचा - मुंबईत येते, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा - कंगना

त्यावर, 'मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.' असं खुलं आव्हान कंगनानं दिलं आहे.

मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा… शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून थेट कृती करतो. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात, असं संजय राऊत म्हणाले.

तसंच मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला इथं राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही. ही मुंबई १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. १९९२ ची दंगल असो किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांनी बलिदान देऊन लोकांना वाचवलं आहे. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही, वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा