Advertisement

हा तर 18 हजार कोटींचा घोटाळा - निरुपम


हा तर 18 हजार कोटींचा घोटाळा - निरुपम
SHARES

आरे कॉलनीमध्ये होणाऱ्या कारशेडसाठी महालक्ष्मी रेसकोर्स, कलिना, कुलाबा आणि कांजुरमार्ग येथे जागा सुचवली असताना देखील मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीमध्ये उभारण्याचा घाट राज्य सरकारने का घातला? असा सवाल करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हा 18 हजार कोटींचा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांवर केला.


मुख्यमंत्र्यांची बिल्डरांशी हातमिळवणी 

कारशेड बांधण्यासाठी फक्त 12 ते 18 हेक्टर जागा लागते. पण आरेतील 30 हेक्टर जागा कारशेडसाठी वापरण्यात येणार आहे. ही 30 हेक्टर जागा का? असा सवाल करत उरलेली जागा खासगी विकासकाला देण्याचा घाट या सरकारने घातला असल्याचे सांगत हा बिल्डर आणि सरकारचा आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांचा मोठा घोटाळा असल्याचा आरोपही निरुपम यांनी यावेळी केला. तसेच सामाजिक संस्थांच्या विरोधानंतरही मुख्यमंत्री मेट्रोचे कारशेड आरेमध्येच बनवण्यासाठी आग्रही का आहेत? असा सवाल देखील निरुपम यांनी उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांसोबत हात मिळवणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

मुंबईमध्ये जमीन राहिलेली नाही त्यामुळे या जमिनीवर बिल्डर आणि सरकारचा डोळा आहे. चार ते पाच मोठ्या बिल्डरचा हा प्लॅ असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली आहे. तसेच कोणतीही परवनागी नसताना काम सुरू करून कायदा मोडण्यामागे देखील मुख्यमंत्र्यांचा हात नाही का? 

संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस


पेपरमध्ये जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल

आरे कारशेडचा जो डीपी प्लान बनवण्यात आला आहे, त्यात येथे स्पोर्ट, कल्चरल, थीम पार्क आणि त्यांनतर मेट्रो 3 साठी डेपो बनवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र वर्तमानपत्रात जी जाहिरात दिली आहे, त्यामध्ये येथे कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक काम होणार नसल्याचे सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोपही निरूपम यांनी यावेळी केला.



हेही वाचा

आंदोलनाची माहिती मिळताच प्रकाश मेहता पळाले - संजय निरूपम


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा