Advertisement

विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवा, बलात्कार थांबतील- भगतसिंग कोश्यारी

हैदराबाद, उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनांमुळे देशभर संतापाची लाट उसळलेली असताना बलात्कार थांबवायचे असतील, तर लहान मुलांना संस्कृत श्लोक शिकवायला हवेत, असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवा, बलात्कार थांबतील- भगतसिंग कोश्यारी
SHARES

हैदराबाद, उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनांमुळे देशभर संतापाची लाट उसळलेली असताना बलात्कार थांबवायचे असतील, तर लहान मुलांना संस्कृत श्लोक शिकवायला हवेत, असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला आहे. नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज अॅडमिनीस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईल लोकांमधील फरक सांगताना काेश्यारी यांनी समाजात सत्ता, ज्ञान पैसा यांचा गैरवापर कसा होतो, हे देखील समजावून सांगितलं.

हेही वाचा- बेळगावातील मराठी माणूस हिंदू नाही का? निघाले देशाबाहेरील हिंदूंना न्याय द्यायला- ठाकरे

'एक काळ असा होता ज्यावेळी प्रत्येक घरात मुलीची पूजा केली जायची. परंतु, आज देशातील 'दुष्ट' शक्ती देशात महिलांवर बलात्कार करत आहेत, अत्याचार करत आहेत. सत्तेचा, शक्तीचा वापर हा गैरवापर करण्यासाठी असतो की सरंक्षण करण्यासाठी? त्यामुळे या सर्वांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा...संस्कृत श्लोकांमुळे मन बलात्कारासारख्या विचारांपासून परावृत्त होते. त्यामुळे बलात्कार रोखता येतील ' असं कोश्यारी म्हणाले.

हैदराबादमधील पशुवैद्यक महिलेवरील तसंच उन्नाव येथील चिमुरडीवरील बलात्काराच्या घटनेने देश हादरून गेला होता. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी बलात्काराच्या घटना घडत आहेत. बलात्काराचे खटले वर्षानुवर्षे चालत असल्याने गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिलेला नाही. दरम्यानच्या काळात बलात्काऱ्यांना अनेक पळवाटा मिळतात. त्यामुळे कडक कायद्याची मागणी होत असताना राज्यपालांनी केलेल्या विधानावर काही जणांकडून टीका देखील केली जात आहे. 

हेही वाचा- सावरकरांचे गायींबद्दलचे विचार तुम्हाला मान्य आहेत का? ठाकरेंचा भाजपला थेट प्रश्न

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा