Advertisement

मुंबईकरांचा अन्नदात्यासाठी अन्नत्याग!

मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाण्यातील जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनी धरणं धरत एक दिवसीय उपवास केला. या अन्नत्याग आंदोलनाला मुंबईसह राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रधुनाथदादा पाटील यांनी दिली.

मुंबईकरांचा अन्नदात्यासाठी अन्नत्याग!
SHARES

बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या ७५ हजार शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी मुंबईसह राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाण्यातील जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनी धरणं धरत एक दिवसीय उपवास केला. या अन्नत्याग आंदोलनाला मुंबईसह राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रधुनाथदादा पाटील यांनी दिली.


का केला अन्नत्याग?

१९ मार्च १९८६ रोजी यवतळमाळ येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने कर्ज आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून कुटुंबासह आत्महत्या केली होती. मात्र त्यानंतरही राज्यातील धोरणात बदल न झाल्याने राज्यातील आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. सरकारविरोधातील हा असंतोष व्यक्त करण्यासाठी विविध शेतकरी संघटना आणि सेवाभावी संस्थांकडून हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं.


चांगला प्रतिसाद

त्यानुसार वांद्रयातील आणि ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनी धरणे आंदोलनात सहभागी होत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अन्नत्याग आंदोलन केलं. समितीने जिथे असाल तिथे अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन सर्वसामान्यांना केलं होतं. या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचंही पाटील यांनी सांगितलं.



हेही वाचा-

पायाच्या जखमेपेक्षा मनाची जखम मोठी, शेतकरी आजीची व्यथा

शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, मिळालं लिखित आश्वासन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा