मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच- उद्धव ठाकरे

अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेल्या 'मेस्मा' कायद्याला विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात शिवसेना आमदारांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याला स्थगिती दिल्याचं घोषित केलं. मात्र यानंतरही जोपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असं उद्धव यांनी जाहीर केलं.

मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच- उद्धव ठाकरे
SHARES

अंगणवाडी सेविकांनी जो लढा दिला त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं थाेेडंच आहे. पण, जोपर्यंत त्यांना पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सरकारला दिला. 'मेस्मा'ला स्थगिती मिळाल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी शिवसेना भवन इथं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी उद्धव बोलत होते.

शिवसेनेच्या विरोधामुळेच...

अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेल्या 'मेस्मा' कायद्याला विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात शिवसेना आमदारांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याला स्थगिती दिल्याचं घोषित केलं. मात्र यानंतरही जोपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असं उद्धव यांनी जाहीर केलं.

लाल बावट्यासोबतचं नातं

शेतकरी आंदोलनालाही सेनेचा पाठिंबा असून लाल बावटा आणि शिवसेनेचं नातं जगजाहीर असल्याचं त्यांनी म्हटलं. पाठिंबा द्यायचा असो किंवा विरोध करायचा असो शिवसेना जे काही करते ते उघडपणे करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आपण कोणत्याही गोष्टीची प्राथमिकता लक्षात घ्यायला हवी. एकीकडे उद्योगपतींना पायघड्या घालायच्या आणि सामान्य माणसाकडे दुर्लक्ष करायचं, हे मला पटणारं नाही, त्यामुळेच मी सत्ताधाऱ्यांविरोधात उघडपणे बोलत असल्याचं उद्धव म्हणाले.हेही वाचा-

सरकारचा गनिमी कावा!! विरोधकांना गाफील ठेवत विश्वासदर्शक ठराव पास

अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' कसा लावता? विरोधक आक्रमकसंबंधित विषय