Advertisement

मुंबईची तुंबई होण्यामागे ‘हे’ कारण, शिवसेनेचा खुलासा

मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपलं बोंबा मारणं सुरूच ठेवतात.

मुंबईची तुंबई होण्यामागे ‘हे’ कारण, शिवसेनेचा खुलासा
SHARES

मुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणं आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणं हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपलं बोंबा मारणं सुरूच ठेवतात, अशा शब्दांत मुंबईत आलेल्या पुरावरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. (shiv sena explains mumbai rains and flood in September)

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेनेने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी हे काही नवीन समीकरण नाही. मंगळवारी तेच घडलं. फक्त २४ तासांत तब्बल २८६.४ मिमी पाऊस मुंबापुरीवर कोसळला. मागील अडीच दशकातील २४ तासांत कोसळलेला हा विक्रमी पाऊस होता. बुधवारीदेखील पावसाची बॅटिंग सुरूच होती. त्यामुळे अनलॉकमुळे जे काही जनजीवन मुंबईत सुरू झालं आहे ते ठप्प झालं. पुढील २४ तासांतही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन मुंबई महापालिकेला करावं लागलं त्यावरूनही गेल्या २४ तासांत पावसाने मुंबईत केलेल्या धुमशानाची कल्पना येते. १९९४ ते २०२० या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.  

हेही वाचा - मुंबईत ४८ तासात २४० मिमी पाऊस

बरं, सव्वा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या या महानगरीचं चलनवलन फक्त एकट्या महापालिकेच्या हातात आहे का, तर तसंही नाही. इतरही सरकारी यंत्रणांकडे मुंबईच्या वेगवेगळ्या कामांची जबाबदारी आहे. अशा सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी. प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईचे काही भाग जलमय होतात, त्याचा परिणाम जनजीवनावर, वाहतुकीवर होतो. पुन्हा मुंबईची भौगोलिक आणि इतर स्थिती याचाही भाग आहेच. अशाही परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आपलं कर्तव्य चोखपणे बजावत असतात. 

अशा वेळी त्यांच्याविरुद्ध एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखंच आहे. मुंबईतील पाणी तुंबले म्हणून बोंब मारणारे नागपूर, अहमदाबाद अशाच प्रकारे जलमय होतं; तेव्हा मात्र गप्प असतात. मुंबई पावसाने जलमय होऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे. तशी ती घेतली जातच असते, पण २४ तासांत अडीच दशकातील विक्रमी पाऊस कोसळत असेल तर कसं व्हायचं? बरं, मागील काही वर्षांत मुंबईच्या पावसानेही ‘मूड’ बदलला आहे. कधी तो २४ तासांत विक्रमी प्रमाणात पडतो तर कधी महिन्याच्या पावसाची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करून मोकळा होतो. याही वर्षी जुलै, ऑगस्ट आणि आता तेच घडले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षी पावसाचं भरभरून दान पडलं आहे, असं अग्रलेखात लिहिण्यात आलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा