Advertisement

“विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं”

विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं, असं म्हणत शिवसेनेने भाजपला डिवचलं आहे.

“विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं”
SHARES

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोमणेबाजी सुरू झाली आहे. विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं, असं म्हणत शिवसेनेने भाजपला डिवचलं आहे.

विधान परिषद निवडणूक निकालानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (anil parab) म्हणाले की, आजचा विधानपरिषदेचा निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं, असं म्हणता येईल. अमरावतीतील शिवसेनेच्या वाट्याला आलेली जागा आम्ही हरलो, पण ही जागा मागील अनेक वर्षांपासून अपक्ष उमेदवारच जिंकत आले आहेत. त्यामुळे आम्हाला सांगण्यापेक्षा भाजपाने आत्मचिंतन करावं. कारण अनेक वर्षे जिंकणाऱ्या पुणे आणि नागपूर अशा दोन जागांवर ते पराभूत झाले आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे. 

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील जागा वाटून घेताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने (congress) ही निवडणूक एकत्रित लढवली होती. यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी दोन जागा आणि शिवसेनेच्या वाट्याला अमरावतीतील एकच जागा आली होती. परंतु या जागेवर देखील शिवसेनेला विजय मिळवता आला आहे. तर जागा जिंकली जिंकली म्हणता भाजपचा उमेदवार देखील दुसऱ्या फेरीतून बाद झाला. त्यामुळे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची धुळे-नंदूरबार ही एकच जागा स्वत: भाजपला जिंकता आलेली आहे.  

हेही वाचा- केवळ अधिवेशनावर निर्बंध आणणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस

या मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे (ncp) सतीश चव्हाण आणि पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. तर अमरावती मतदारसंघात अपक्ष उमेदवार जिंकला आहे.

 महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा हा निकाल म्हणजे महाविकासआघाडीचा विजय आहे. महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केल्यानेच हे यश मिळालं आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात मतांची मोठी आघाडी भाजपच्या (bjp) हाती असल्याने आमच्यासाठी हा निर्णय आश्चर्यकारक नव्हता. परंतु गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जे काम केलं त्या कामाच्या जोरावर पुणे आणि नागपूर मतदाससंघातील कधीही न मिळालेली जागा देखील महाविकास आघाडीच्या वाट्याला आले हाच खरा विजय. या निकालातून सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारल्याचं दिसलं आहे. महाराष्ट्रतील चित्र बदलल्याचं हे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया या निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी दिली.

(shiv sena leader anil parab criticises bjp after victory in vidhan parishad election)

हेही वाचा- महाविकास आघाडीची पाॅवर जोखण्यात कमी पडलो- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा