Advertisement

‘हा खेळ सावल्यांचा’, शिवसेनेची मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर टीका

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून ​महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या​​​ (MNS) ‘शॅडो कॅबिनेट’वर सडकून टीका करण्यात आली आहे.

‘हा खेळ सावल्यांचा’, शिवसेनेची मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर टीका
SHARES

‘शॅडो कॅबिनेट’चा (shadow cabinet) प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) ‘शॅडो कॅबिनेट’वर सडकून टीका करण्यात आली आहे. 

हेही वाचा- चांगलं काम करूनही मनसेला मतदान नाही, याला काय अर्थ आहे? - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ मार्च रोजी झालेल्या १४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ठाकरे सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी ‘शॅडो कॅबिनेट’ची घोषणा करण्यात आली. या ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये गृह, महसूल, अर्थ विभागासहीत पर्यटन विभागापर्यंत सरकारच्या सर्व खात्यांवर नजर ठेवण्यासाठी मनसेच्या ३० पेक्षा जास्त नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief raj thackeray) यांचे चिरंजीव आणि युवा नेते अमित ठाकरे (Amit thackeray) यांचाही समावेश आहे. 

मनसेच्या या ‘शॅडो कॅबिनेट’चा (shadow cabinet) शिवसेनेकडून (shiv sena) समाचार घेण्यात आला आहे. ''महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता 'शॅडो' कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा' नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. 'शॅडो'ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ''जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.'' हे बरे झाले. पुन्हा 'शॅडो'वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा 'शॅडो' राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे 'खेळ सावल्यांचा' अधिकच रंगतदार झाला असता,'' अशी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून करण्यात आली आहे.  

हेही वाचा- आदित्यच्या पर्यटनावर नजर ठेवणार अमित ठाकरे

याआधी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो १४ वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही. आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत. त्यामुळे याचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित, असं म्हणत ट्विटद्वारे मनसेवर टीका केली होती.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा