Advertisement

प्रतिक्षा नगरचा गड शिवसेनेने राखला; रामदास कांबळे ६६१६ मतांनी विजयी


प्रतिक्षा नगरचा गड शिवसेनेने राखला; रामदास कांबळे ६६१६ मतांनी विजयी
SHARES

मुंबईतील महापालिका प्रभाग क्रमांक १७३ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार रामदास कांबळे विजयी झाले आहेत. कांबळे यांनी ६६१६ मते मिळवत काँगेसचे उमेदवार सुनील शेट्ये यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला कडवी टक्कर दिली. त्यामुळे केवळ ८५० मतांनी काँग्रेसचा पराभव झाला.


पहिल्या फेरीपासून आघाडी

शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवारी मतदान झालं होतं. या निवडणुकीत केवळ ४० टक्के मतदान झालं. या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी जोगळेकर वाडी महापालिका शाळेत झाली. या मतमोजणीच्या शिवसेना उमेदवार रामदास कांबळे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते.



नाममात्र अंतर

मात्र, काँग्रेसचे उमेदवार सुनील शेट्ये यांचा मतांचा आकडाही वेगाने वाढत असल्याने दोघांमध्ये नाममात्र अंतर हाेते. अंतिम फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराची मतसंख्या ६६१६ झाल्यावर ते विजयी ठरले. काँग्रेस उमेदवार सुनील शेट्ये यांना ५७७१ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार गौतम झेंडे यांना केवळ ५४९ मतं मिळाली. तसंच २३४ मतदारांनी नोटांचा वापर केला.


मतांचा टक्का वाढला

काँग्रेस उमेदवाराच्या मतांवर नजर टाकली असता त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळल्याने शिवसेनेच्या उमेदवारांच्या तोंडाला फेस आला होता. शिवसेनेचे विभाग प्रमुख मंगेश सातमकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचं आधीच सांगितलं होतं. परंतु त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळवता आलं नाही. त्यातुलनेत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी त्यांचा मतांचा टक्का वाढलेला आहे.

दिवंगत प्रल्हाद ठोंबरे शिवसेनेचेच असल्याने रामदास कांबळे यांच्या विजयाने शिवसेनेला महापालिकेतील सदस्य संख्या कायम राखण्यात यश आलं आहे.



हेही वाचा-

...तरीही महापालिका सभागृह नेतेपद रिक्तच

महापालिका कर्मचाऱ्यांना कामावर अर्धा तास उशिरा येण्याची मुभा!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा