राजीनाम्यांचे वृत्त निराधार

  Pali Hill
  राजीनाम्यांचे वृत्त निराधार
  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये मराठा मोर्चाबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. त्यानंतर शिवसेनेतील मराठा नेते नाराज असल्याच्या तसेच खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार शशिकांत खेडेकर व संजय रायमुलकर यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले होते. मात्र शिवसेना नेते अनिल देसाई यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

  अनिल देसाई यांनी राजीनाम्याच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे. तर खासदार प्रतापराव जाधव यांनीही आपल्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.