Advertisement

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी १०० कोटी देण्याला शोभा डेंचा विरोध

दादर इथल्या महापौर निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारनं १०० कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर शोभा डे यांनी आक्षेप घेतला आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी १०० कोटी देण्याला शोभा डेंचा विरोध
SHARES

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवला आहे. स्मारकासाठी १०० कोटी रुपये खर्च करणं हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न शोभा डे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

दादर इथल्या महापौर निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान राणी बागेतील एका बंगल्यात स्थलांतरित करण्यात आलं आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारनं १०० कोटीच्या निधीची तरतूद केली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर शोभा डे यांनी आक्षेप घेतला आहे. आम्हाला आणखी स्मारकांची गरज नाही. आम्हाला शाळा आणि रुग्णालयं हवी आहेत. मला १०० कोटी रुपयांचं अनुदान द्या, एक नागरिक म्हणून लोकांच्या हितासाठी त्याचा कसा वापर करायला हवा हे मी दाखवून देते, असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

शोभा डे यांच्या ट्विटला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी शोभा डे यांच्या ट्विटचा विरोध केला आहे.

आता शोभा डे यांच्या ट्विटला शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचेच लक्ष आहे. 


हेही वाचा

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं गणेशपूजन संपन्न, ठाकरे कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

३३ हजार रुद्राक्षांनी साकारली बाळासाहेबांची प्रतिमा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा