Advertisement

सपा-बसपाकडून १९ उमेदवार जाहीर


सपा-बसपाकडून १९ उमेदवार जाहीर
SHARES

समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) आघाडीने गुरूवारी लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली. नागपूर लोकसभा मतदारसंघातून सपा-बसपा आघाडीकडून जमाल इब्राहिम तर सोलापूर मतदारसंघातून राहुल सरोदे निवडणूक लढणार आहेत.  सपा-बसपा आघाडीने १९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. तसंच दोन्ही पक्ष काँग्रेस आणि भाजपाव्यतिरिक्त इतर पक्षांशी बोलणीही करत आहेत. 


काँग्रेसवर टिका

सपा-बसपा आघाडीमुळे काँग्रेसचं नुकसान होईल असं बोललं जात आहे. ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी सपा-बसपाबरोबर एकत्र येऊन उमेदवार उतरवण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. वंचित  बहुजन आघाडीने याआधीच काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टिका केली होती. 


सपाकडून ४ उमेदवार 

 राज्य बसपा अध्यक्ष सुरेश साखरे यांनी म्हटलं होतं की, काँग्रेस स्वतःच या आघाडीत सामील होण्यास इच्छुक नाही. आघाडीत सामील न होऊन काँग्रेस याचा फायदा थेट भाजपाला पोचवत आहे. समाजवादी पार्टीने राज्यात एकूण ४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. सपाने मुंबई उत्तर -पश्चिम मतदारसंघातून सुभाष पासी यांना उतरवलं आहे. या ठिकाणाहून काँग्रेसकडून संजय निरूपम निवडणूक लढवत आहेत. हेही वाचा -

‘शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे’, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका

एकच स्पिरीट, नो किरीट; सोमय्यांना शिवसेनेचा आक्रमक विरोध
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा