Advertisement

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

१ ऑक्टोबर २०१८ पासून हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोखीने देण्यात येणार आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत मंगळवारी शासन निर्णय जारी केला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ
SHARES

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सरकारने महागाई भत्त्या (डीए)त ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दसऱ्याची भेट दिली आहे.


दिवाळी भेट

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने राज्य शासकीय आणि कर्मचाऱ्यांना हा भत्ता मंजूर केला आहे. (वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) देय असलेला हा भत्ता आहे. महागाई भत्याच्या दरात १ जानेवारी २०१८ पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या ९ महिन्यांच्या वाढीव महागाई भत्त्याच्या फरकाची रक्‍कम कर्मचार्‍यांना देण्यात येईल.


रोखीने मिळणार

१ ऑक्टोबर २०१८ पासून हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोखीने देण्यात येणार आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत मंगळवारी शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार असला, तरी केंद्र सरकारने १ जुलै २०१८ पासून वाढवलेला ६ टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचार्‍यांना अद्याप मिळालेला नाही.

सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारीत करण्यात आलेल्या वेतन संरचनेच्या वेतनावरील देय महागाई भत्ता याआधी १३९ टक्के मिळत होता. यामध्ये आता बदल करून ३ टक्के वाढीसह १४२ टक्के करण्यात आला आहे.



हेही वाचा-

दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा; उद्धवचा सरकारला टोला

गुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतच आहे; राजचा मोदींना टोमणा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा