Advertisement

मी मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार, पण... : उद्धव ठाकरे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्यातील सध्याच्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला.

मी मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार, पण... : उद्धव ठाकरे
SHARES

बुधवार, 22 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह केले आणि महाराष्ट्रातील नागरिकांना संबोधित केले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्यातील सध्याच्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठिक आहे. मला दु:ख झाले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,असं तोंडावर सांगावं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा... मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१२ साली बाळासाहेब आपल्यातून गेले आणि त्यानंतर २०१४ साली आपण एकटे लढलो. तेव्हाही आपण हिंदूच होतो. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले होते. मधल्या काळात जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे मिळालं हे लक्षात ठेवा.

माझी जी शस्त्रक्रीया झाली होती त्यानंतरचे दोन, तीन महिने फार विचित्र होते. तो काळ फार विचित्र होते. त्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे. मी भेटत नव्हतो तर काम होतं नव्हती असं नाही. मी पहिली कॅबिनेट मिटींग अशीच ऑनलाइन केली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

सध्या एकनाथ शिंदे यांची जे विधानसभा अध्यक्षांना (Assembly Speaker) पत्र लिहिलं आहे. त्या पत्रावर 34 शिवसेना आमदारांच्या सह्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सहाजिकच उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांची सख्या ही अल्पशी उरलेली. सकाळपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचीही चर्चा सुरू होती. त्यामुळे त्यांनी समोर येत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.  

शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड झाल्याच्या 72 तासांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. या काही तासांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं फोनवरून बोलणंंही झालं होतं. तसेच अनेक बैठका पार पडल्या आहेत. इकडे मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत.



हेही वाचा

मुख्यमंत्र्यांनी राजिनामा दिल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या राजकीय गणितं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, नाना पटोलेंची माहिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा