Advertisement

आता २४ व्या आठवड्यातही करता येईल गर्भपात

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी (दुरुस्ती) बिल २०२० ला मंजुरी दिल्याने आता महिलांना २४ व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार आहे. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

आता २४ व्या आठवड्यातही करता येईल गर्भपात
SHARES

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी (दुरुस्ती) बिल २०२० ला मंजुरी दिल्याने आता महिलांना २४ व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार आहे. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

गर्भपाताचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेला उत्तर देताना महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून गर्भपात करण्याचा कालावधी २० आठवड्यावरून २४ ते २६ आठवडे करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली होती.

हेही वाचा- चोरीला गेलेला मोबाइल ब्लाॅक करता येणार, सरकारने दिली सुविधा

त्यानुसार गर्भपाताच्या मुदतवाढीसाठी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, १९७१ (Medical Termination of Pregnancy Act, 1971) मध्ये दुरूस्ती करणार विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलं.  

सध्या भारतात कायद्यानुसार गर्भपात करण्याचा कालावधी २० आठवडे आहे. २० आठवड्यांपेक्षा जास्त गर्भ असेल तर गर्भपात करता येत नाही, तसं केल्यास गुन्हा नोंदवला जातो. गर्भपात करण्याचा कालावधी २० आठवडे असल्यामुळे ग्रामीण भागात असुरक्षित गर्भपात करण्याचं प्रमाण वाढत आहे. गरोदरपणात २० आठवड्या नंतरच्या काळात काही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली, तर आईचा जीव वाचवण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. पण अशा प्रकारे गर्भपात करण्यासाठी आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा