Advertisement

महाराष्ट्र हळुहळू प्रतिगामी होतंय- प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जातं, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतंय, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र हळुहळू प्रतिगामी होतंय- प्रकाश आंबेडकर
SHARES

महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जातं, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतंय, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. शिवाय अर्थव्यवस्था सुरळीत करणे आणि मंदिरं खुली करण्याच्या सरकारच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (VBA chief prakash ambedkar criticised cm uddhav thackeray on temple reopening issue in maharashtra)

यासंदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन होतं. आता ते हळुहळू प्रतिगामी होताना दिसतंय. कोरोनाचं लाॅकडाऊन उठवताना केंद्राने अनेक गाईडलाइन दिल्या. परंतु महाराष्ट्र शासन त्याला मान्य करायलाच तयार नाही. इतर राज्यांमध्येसुद्धा मी फिरलोय. इतर राज्यांनी मंदिर खोलली, तिथला व्यवसाय आणि भक्तांची दोघांचीही बाजू साधली. परंतु अजूनही महाराष्ट्र शासन मंदिर खोलायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला इतर राज्यांनी आर्थिक व्यवस्था चालू केल्या परंतु महाराष्ट्र शासन यादृष्टीने काहीही पावलं उचलत नाही. सगळा बेभरवशी कारभार सुरू आहे, असं एकंदरीत दिसतंय. महाराष्ट्र शासनाने पुरोगामीत्व आणि निर्णय घेणारं शासन अशी आपली प्रतिमा पुन्हा उभी करावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा - “अन्यथा, लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”

मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावरून सध्या ठाकरे सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. परंतु सरकार अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या मागणीसाठी भाजपने आंदोलनही केलं तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्त्वाची आठवण करून दिली होती. 

त्यावर माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसतखेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

Have you suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणं म्हणजे ‘secular’ असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘secularism’ आहे. तो आपल्याला मान्य नाही का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित विषय
Advertisement