Advertisement

“भाजप नेत्यांचीही महिलांसोबतची डझनभर प्रकरणं मला सांगता येतील”

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत शिवसेना नेते मौन बाळगून असताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

“भाजप नेत्यांचीही महिलांसोबतची डझनभर प्रकरणं मला सांगता येतील”
SHARES

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत शिवसेना नेते मौन बाळगून असताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजपा नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

संजय राठोड यांच्याबाबत भाष्य करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथं नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केलं. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (shiv sena) नेत्याची बाजू मांडली.

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोड यांचा राजीनामा?

दरम्यान, भाजपच्या दबावापुढे झुकून वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अद्याप तरी महाविकास आघाडी सरकार किंवा शिवसेनेकडून त्यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

स्पोकन इंग्लिश क्लाससाठी भावासोबत पुण्यात राहत असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. शिवाय त्यांच्या राजीनाम्यासाठीही भाजप नेते आक्रमक झाले आहेत. 

(vijay wadettiwar replies bjp allegation on pooja chavan suicide case)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा