Advertisement

८ बड्या बिल्डरांना महारेराचा दणका, कायद्याचं उल्लंघन पडलं महागात

कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांविरोधात ग्राहक पंचायतीकडून तक्रारी दाखल केल्या जात आहेत. अशाच ३१ बिल्डरांविरोधात काही दिवसांपूर्वी ग्राहक पंचायतीनं महारेराकडे तक्रार केली होती. याच ३१ बिल्डरांमधील ८ बिल्डरांना दोषी ठरवत महारेरानं दंड ठोठावत या बिल्डरांना दणका दिला आहे.

८ बड्या बिल्डरांना महारेराचा दणका, कायद्याचं उल्लंघन पडलं महागात
SHARES

महारेरा कायद्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून या कायद्याचा भंग करणाऱ्या बिल्डरांना दणका देण्याचं काम महारेराकडून जोरात सुरू आहे. महिन्याभरापूर्वी ७ बिल्डरांना दणका देत त्यांच्याकडून २ ते १२ लाखांचा दंड महारेरानं वसूल केला होता. आता आणखी ८ बिल्डरांना नुकतंच महारेरानं दोषी ठरवलं असून त्यांना २ ते १० लाखांचा दंड ठोठावला आहे.


'अशा' तऱ्हेने कायद्याचं उल्लंघन

महारेरा कायद्यानुसार आता बिल्डरांना आपल्या गृहप्रकल्पाची नोंदणी महारेराकडे करणं बंधनकारक असून अशी नोंदणी असेल तरच घरांची विक्री करता येणार आहे. त्यातच या विक्रीसाठी जाहिराती करताना त्या जाहिरातीत रेरा नोंदणी क्रमांकासह महारेराच्या वेबसाईटचा उल्लेख असणं बंधनकारक आहे. असं असताना आजही अनेक बिल्डर नोंदणीशिवाय वा वेबसाईटच्या उल्लेखाशिवाय जाहिराती करत महारेरा कायद्याचा भंग करत आहे.


ग्राहक पंचायतीकडून तक्रार

अशा बिल्डरांवर मुंबई ग्राहक पंचायतीची करडी नजर असून या बिल्डरांविरोधात ग्राहक पंचायतीकडून तक्रारी दाखल केल्या जात आहेत. अशाच ३१ बिल्डरांविरोधात काही दिवसांपूर्वी ग्राहक पंचायतीनं महारेराकडे तक्रार केली होती. याच ३१ बिल्डरांमधील ८ बिल्डरांना दोषी ठरवत महारेरानं दंड ठोठावत या बिल्डरांना दणका दिला आहे.


कुठल्या बिल्डरचा समावेश?

नोंदणी न करता, नोंदणी क्रमांक नमूद न करता वा महारेराच्या वेबसाईटचा उल्लेख न करता जाहिरात केल्याचा ठपका या ८ बिल्डरांवर ठेवण्यात आला आहे. त्रिधातू मौर्या या बिल्डरला नोंदणी न करता जाहिरात केल्याप्रकरणी १० लाखांचा दंड लावण्यात आला आहे. तर सुमीत ग्रुप, वाधवा ग्रुप, इप्सित प्रोजेक्ट, ज्योती बिल्डर्स, परिणी बिल्डींग प्राॅपर्टीज, हावरे प्राॅपर्टीज आणि कर्म प्राॅपर्टीज या बिल्डरांना महारेराच्या वेबसाईटचा उल्लेख जाहिरातीत नसल्याप्रकरणी २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.



हेही वाचा-

नियम धाब्यावर ठेवून जाहिरात? ७ बिल्डर आले गोत्यात!!

'महारेरा'चं उल्लंघन करणारे ३१ बिल्डर रडारवर

'महारेरा'चा ऐतिहासिक निर्णय ! ताबा घेतला, पण ओसी नसलेल्या इमारतीलाही नोंदणी बंधनकारक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा