सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे कामकाज होणार सोपे

 Mumbai
सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे कामकाज होणार सोपे

मुंबई - मुंबईसह राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज आता लवकरच सोपे आणि सुलभ होणार आहे. इतकेच नव्हे तर गृहनिर्माण संस्थांचे कायदेही परिपूर्ण आणि सुस्पष्ट होणार आहेत. कारण आत लवकरच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये स्वतंत्र प्रकरण अंतर्भूत करण्यात येणार आहे. यादृष्टीने अभ्यास करून आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी एक समिती स्थापण करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून महिन्याभरात शिफारशी सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती या समितीतील सदस्य रमेश प्रभू यांनी दिली आहे.

शेती संस्था, साखर उद्योगाशी संबंधित संस्था, पतसंस्था आणि गृहनिर्माण संस्थांसाठी एकच अधिनियम आहे. मात्र त्यावेळीच गृहनिर्माण संस्थाचे कामकाज हे वेगळे आणि व्यापक आहे. त्यातच गृहनिर्माण संस्थांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण अंतर्भूत करण्याची मागणी गेल्या वीस वर्षांपासून होत होती. अखेर ही मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार नुकतेच सरकारने या संधीचा अध्यादेश जारी करत समिती स्थापण केली आहे.

Loading Comments 

Related News from रिअल इस्टेट