Advertisement

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये ७६९ अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) सोमवारी ७६९ अंकांची घसरण नोंदवत ३६,५६२ वर बंद झाला.

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये ७६९ अंकांची घसरण
SHARES

घसरलेला जीडीपी आणि मंदीचं सावट यामुळे गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतला आहे. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात मुंबई शेअर बाजारात (BSE) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) सोमवारी ७६९ अंकांची घसरण नोंदवत ३६,५६२ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी (nifty) देखील २२५ अंकांनी घसरून १०, ७९७ वर आपटला. 

शुक्रवारी सेन्सेक्स २६३.८६ च्या वाढीसह ३७,३३२.७९ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी देखील ७४.९५ अंकांच्या वाढीसह ११,०२३ वर बंद झाला होता. त्यानंतर तीन दिवसांच्या सुटीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्याचं दिसत आहे.  

पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मध्ये विकासदर ५.८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यावर घसरला आहे. गेल्या वर्षभरात त्यात जवळपास ३ टक्के घसरण झाली आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. तसंच रुपयाही ६४ पैशांनी घसरला आहे.

यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कमालिची निराशा पसरली आहे. याचे पडसाद शेअर बाजारावर पडत असल्याचं दिसून येत आहे. 



हेही वाचा-

येणार १०० रुपयांची चमकणारी नोट

पीएनबी, कॅनरा, युनायटेड, युनियनसह १० बँकांचं होणार विलीनीकरण, निर्मला सीतारमण यांची घोषणा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा