Advertisement

सेन्सेक्सने १६६ तर निफ्टीने ४२ अंकांची नोंदवली वाढ

शुक्रवारी शेअर बाजारात आयटी आणि धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली आहे. पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअरमध्ये विक्रीचा सपाटा राहिला.

सेन्सेक्सने १६६ तर निफ्टीने ४२ अंकांची नोंदवली वाढ
SHARES

शेवटच्या एक तासामध्ये झालेल्या खरेदीमुळे देशातील शेअर बाजार शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वधारून बंद झाले. सेन्सेक्स १६६ अंकाने वाढून ५२,४८४ वर बंद झाला. तर निफ्टीही ४२ अंकाने वधारून १५,७२२ वर स्थिरावला.

शुक्रवारी शेअर बाजारात आयटी आणि धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली आहे. पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअरमध्ये विक्रीचा सपाटा राहिला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, शेवटच्या तासात झालेल्या घरेदीमुळे दोन्ही निर्देशांक सावरले.  

आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला मोठे बळ मिळाले. सुरुवातीच्या सत्रात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने गुंतवणूकदारांनी छोट्या व मध्यम शेअर्समध्ये मोठी खरेदी केली. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक ०.३३ टक्के वाढीसह बंद झाला. तर निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक १.०१ टक्के वाढला. 

निफ्टीच्या मेटल इंडेक्समध्ये १.४० टक्के घसरण झाल्याने बाजारावर मोठा दबाव होता. मात्र, निफ्टीच्या फार्मा, मीडिया, रिअल्टी, वित्तीय सेवा, बँकिंग, वाहन आणि ऊर्जा निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली.  



हेही वाचा -

  1. पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड

  2. रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा