Advertisement

सेन्सेक्स, निफ्टीने घेतली उसळी

अमेरिका आणि इराणमधील तणाव थोडाफार निवळला आहे. त्यामुळे देशातील शेअर बाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

सेन्सेक्स, निफ्टीने घेतली उसळी
SHARES

अमेरिका आणि इराणमधील तणाव थोडाफार निवळला आहे. त्यामुळे देशातील शेअर बाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. गुरुवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स ६३५ अंकांनी वधारून ४१ हजार ४५२ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीही १९० अंकांची मोठी वाढ नोंदवत १२ हजार २१५ वर पोचला. 

शेअर बाजाराची या आठवड्याची सुरूवातच मोठ्या घसरणीने झाली. ३ दिवसात सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला. यामध्ये गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. मात्र, गुरूवारी पुन्हा शेअर बाजाराने तेजी नोंदवली. अमेरिका आणि इराणमधील युद्धाचे ढग विरल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. गुरुवारी  पाॅवर, टेक, वित्त सेवा, बांधकाम, इन्फ्रा, तेल आणि वायू, बँकेक्स, आॅटो या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. तर निफ्टीमध्ये स्माल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. 

एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भरती एअरटेल, इन्फोसिस आयडीएफसी,टाटा मोटर्स, पीएनबी बँक, येस बँक, जिंदाल स्टील आदी चांगले वधारले. तर जीएमआर इन्फ्रा, टीसीएस, एचसीएल टेक या शेअर्समध्ये घसरण झाली. बुधवारी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७४८ कोटींचे शेअर्स खरेदी केले. आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारामंध्ये तेजी होती.



हेही वाचा -

SBI ची नवी योजना, बिल्डरकडून वेळेत घराचा ताबा न दिल्यास बँक पैसे देणार

अॅक्सिस बँकेला १५ हजार कर्मचाऱ्यांनी ठोकला रामराम




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा