Advertisement

वंदे भारत अभियानांतर्गत १ लाख ३३ हजार नागरिक परतले

लॉकडाऊनमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत देशात आणलं जात आहे. आतापर्यंत १२२० विमानांमधून १ लाख ३३ हजार १२५ नागरिकांना मुंबईत आणण्यात आलं आहे.

वंदे भारत अभियानांतर्गत १ लाख ३३ हजार नागरिक परतले
SHARES

लॉकडाऊनमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत देशात आणलं जात आहे. आतापर्यंत १२२० विमानांमधून १ लाख ३३ हजार १२५ नागरिकांना मुंबईत आणण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी ८२ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत. 

मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४३ हजार ९४५ आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील ४१ हजार ५९२ प्रवाशी आहे. याशिवाय इतर राज्यातील ४७ हजार ५८८ प्रवासीहे मुंबई विमानतळावर आले होते.

वंदेभारत अभियानांतर्गत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मले‍शिया,  कुवेत, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया,नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन,आर्यलँड, कतार, हॉगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन,  इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलॅंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो, सिरा लिओन,  लिओन, इथोपिया या विविध देशातून नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.


मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आलेली आहे. तर इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. त्यांना त्यांचे जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्फत क्वारंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.



हेही वाचा- 

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३४८ रुग्ण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा