Advertisement

आयर्लंडने दिला मुंबईतील जुन्या नकाशाचा खजिना

आयर्लंड सरकारकडून मुंबईला नुकतीच एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. या भेटीमुळे मुंबईला ऐतिहासिक दस्तावेज प्राप्त झाला आहे. या भेटवस्तूंमध्ये मुंबईतील अनेक जुन्या नकाशांचा समावेश आहे.

आयर्लंडने दिला मुंबईतील जुन्या नकाशाचा खजिना
SHARES

आयर्लंड सरकारकडून मुंबईला नुकतीच एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. या भेटीमुळे मुंबईला ऐतिहासिक दस्तावेज प्राप्त झाला आहे. या भेटवस्तूंमध्ये मुंबईतील अनेक जुन्या नकाशांचा समावेश आहे. 

३७ नकाशांचा समावेश

आयर्लंडचे भारतातील राजदूत ब्रायन मॅकएडल्फ यांनी नुकतीच माजी वाणिज्यदूत सायरस गुझ्देर यांच्यासोबत कुलाब्यातील एशियाटिक सोसायटीला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांना एशियाटिक सोसायटीकडे १९ व्या शतकाआधीचे जुने नकाशे अत्यंत कमी प्रमाणात असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील नकाशाचा संग्रह सोसायटीला भेट दिला. या संग्रहामध्ये इंग्लंड, आयर्लंडमधील मुंबईशी निगडीत ३७ जुन्या नकाशांचा समावेश आहे.  

अमूल्य देणगी

मॅकएडल्फ यांना जुन्या नकाशांचा संग्रह करण्याचा, जुन्या जागा, संग्रहालयांना भेट देण्याचा छंद आहे. त्यानुसार त्यांनी मुंबईतील जुन्या जागांचा अभ्यास करण्यासाठी ३० वेळा भेट देऊन येथील प्राचीन स्थापत्य कलेचा अभ्यास केला आहे.

मॅकएडल्फ यांच्याकडून नकाशाच्या रुपाने मिळालेली देगणी अमूल्य आहे. बऱ्याचवेळेस जुने नकाशे चांगल्या स्थितीत नसतात पण त्यांनी दिलेले सर्व नकाशे सुस्थितीत असल्याची माहिती एशियाटिक सोसायटीचे सचिव प्रा. विस्पी बालपोरिया यांनी दिली.   



हेही वाचा-

महापालिकेची २३ उद्यानं राहणार २४ तास खुली

रूग्णस्नेही 'वन स्टाॅप सेंटर'मागील क्रियाशील हात!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा