Advertisement

हाजी अली दर्गाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये स्थान

मुंबईतील हाजी अली दर्गाची (Haji Ali Dargah) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ( World Book of Records London) मध्ये नोंद झाली आहे.

हाजी अली दर्गाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये स्थान
SHARES

मुंबईतील हाजी अली दर्गाची (Haji Ali Dargah) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ( World Book of Records London) मध्ये नोंद झाली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये स्थान मिळवलेली हाजी अली दर्गा ट्रस्ट ही जगातील पहिली दर्गा ट्रस्ट आहे. ५५२ वर्ष जुना असलेला हाजी अली दर्गा हा मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान आहे. जगातील सर्वाधिक भेट दिलेली तीर्थस्थळांमध्ये हाजी अली दर्गाचा समावेश आहे. 

 वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनकडून १५ फेब्रुवारीला  हाजी अली दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल सत्तार मर्चंट यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे उस्मान खान यांच्यासहीत अनेक जण उपस्थित होते. दरम्यान, हाजी अली दर्गाचे (Haji Ali Dargah) नुतनीकरण व सौंदर्यीकरण (Renovation and beautification) होणार आहे. नुकतीच मंत्रालयात झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaykh) यांनी  नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचं काम  लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.  नुतनीकरण व सौंदर्यीकरणासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

असे होणार सौंदर्यीकरण

-  मुख्य रस्त्यावर भव्य बुलंद दरवाजा उभारणार

- विविध फुलांची झाडे असलेल्या मुघल गार्डनची निर्मिती

- मुघल गार्डनमध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारे बाकडे, लाईट यांची व्यवस्था

-  भाविकांसाठी विशेष सोयीसुविधासाठी ‘व्हिजिटर प्लाझा’

-  मुख्य रस्ता ते दर्गा या मार्गाचे नुतनीकरण

- दर्गाच्या मुख्य दरवाजाचे सौंदर्यीकरण



हेही वाचा -

‘त्यांची’ तपश्चर्या वाया घालवू नका, भाजपचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा