Advertisement

पारसी बांधवांना प्रार्थनास्थळात जाण्यास परवानगी

पारसी समुदायाचा ‘फरवार्दियान’ हा वार्षिक प्रार्थना विधी पार पाडण्यासाठी मुंबईतील डुंगरवाडी येथील अग्यारी खुली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सशर्त परवानगी दिली आहे.

पारसी बांधवांना प्रार्थनास्थळात जाण्यास परवानगी
SHARES

पारसी समुदायाचा ‘फरवार्दियान’ हा वार्षिक प्रार्थना विधी पार पाडण्यासाठी मुंबईतील डुंगरवाडी येथील अग्यारी खुली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सशर्त परवानगी दिली आहे.  'फरवार्दियान' निमित्त प्रार्थनेसाठी दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथील डुंगरवाडी अग्यारी खुली करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ३ सप्टेंबर रोजी  'फरवार्दियान' हा वार्षिक प्रार्थना दिवस आहे.

सर्वोच्च न्यायालयाने `पर्युषण’ पर्वात जैन समुदायाला शहरातील तीन जैन मंदिरे सशर्त सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आम्हालाही अग्यारी खुली करण्यास परनावगी द्यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. अग्यारी खुली करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  मात्र, आपण दिलेला निर्णय हा अपवादात्मक असून या आदेशाचा आधार घेऊन इतर कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा प्रार्थनेसाठी कोणालाही अशीच परवानगी देण्यात येईल असं कोणी गृहीत धरू नये असंही उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.  

डुंगरवाडी अग्यारी ५५ एकरात पसरलेली आहे. या परिसरात पाच विस्तीर्ण मंडप उभारण्यात आले असून दर तासाला फक्त सहा जणांना मंडपात जाण्यास परवानगी देण्यात येईल असं याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना ऍड. प्रकाश शहा यांनी न्यायालयाला सांगितलं.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १० वर्षाखालील तसेच ६५ वर्षावरील ज्येष्ठांना या प्रार्थना विधीमध्ये सहभाग घेण्यास खंडपीठाने आदेशात मनाई केली आहे. एकावेळी जास्तीत जास्त ३० लोकांनाच अग्यारीमध्ये सोडण्यात यावं, प्रार्थनेसाठी येणाऱ्यांचे शारीरिक तापमान नोंदवणे, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करणे, सामाजिक अंतराचे भान राखणे, स्वच्छता इत्यादी सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य असल्याचंही न्यायालयाने आदेशात सांगितलं आहे. 



हेही वाचा -

मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताच

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा