Advertisement

पालिकेकडून विवाह नोंदणी सेवांना स्थगिती

कोरोनाच्या रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे.

पालिकेकडून विवाह नोंदणी सेवांना स्थगिती
(Representational Image)
SHARES

कोरोनाच्या रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) नं विवाह नोंदणी सेवांना स्थगिती दिली आहे. प्रशासकिय संस्थेनं ट्विटरवर ही घोषणा केली. ट्विटद्वारे, पालिकेनं आरोग्य विभागाद्वारे तपशीलवार माहिती दिली की, शहरातील सध्याच्या कोरोनाव्हायरस परिस्थितीमुळे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.

मुंबईतील सध्याच्या COVID19 परिस्थितीमुळे @mybmchealthdept   ने विवाह नोंदणी सेवा तात्पुरती थांबवली आहे. लवकरच नवीन तारीख आणि वेळ सांगितला जाईल, अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली.  

पालिकेनं पुढे म्हटलं आहे की, नवीन तारखा जाहिर होईपर्यंत पालिका व्हिडिओ केवायसी पर्यायाद्वारे ही सेवा ऑफर करण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे.

अलीकडे, पालिकेनं आपला व्हॉट्सअॅप चॅटबॉट लॉन्च केला आहे. ज्यामध्ये विविध सेवांचा समावेश आहे. प्रारंभ करण्यासाठी, नागरिकांनी 8999228999 वर "हाय" पाठवणं आवश्यक आहे.

नागरिक व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचा वापर करून ८० हून अधिक सुविधांचा लाभ घेता येऊ शकेल. यामध्ये पाणी बिल, घरभाडे, अत्यावश्यक नगरपालिका सेवा, वीज बिल भरणे, फाइलिंग यासारख्या सुविधांचा समावेश आहे. नागरी तक्रार, लसीकरण स्लॉट बुक करणे, विवाह प्रमाणपत्र आणि दुकान परवाना या सेवांचा देखील सहभाग आहे.



हेही वाचा

MPSC परीक्षा 'या' तारखेला होणार

नव्या रुग्णांची नोंद कमी; दीड लाखाहून अधिक रुग्ण बरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा