Advertisement

व्हॉट्सअॅपमुळं सापडला अडीच वर्षांपूर्वी हरवलेला शुभम

सोशल मीडियाच्या मदतीनं मुंबई पोलीसांनी एका अडीच वर्षांपूर्वी हरवलेल्या चिमुरड्याची आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून दिली आहे.

व्हॉट्सअॅपमुळं सापडला अडीच वर्षांपूर्वी हरवलेला शुभम
SHARES

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओंमुळं अनेक जणांना तुरुंगात जावं लागलं आहे. तर काही जण सोशल मीडियाचा प्रचंड विरोध करतात. मात्र, याच सोशल मीडियाच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी हरवलेल्या एका चिमुरड्याची आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून दिली आहे. शुभम मांडवकर असं या मुलाचं नावं असून, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीनं पोलिसांनी अकोल्यातून शोधून शुभमला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केलं आहे.


व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती

२२ मार्च २०१६ रोजी शुभम मांडवकर हा चिमुरडा ३ वर्षांचा असताना नेहरुनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळील परिसरातून हरवला होता. त्यावेळी नेहरुनगर पोलिसांनी शुभम हरवल्याची माहिती त्यांच्या महाराष्ट्र पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली. त्यानंतर या माहितीच्यानुसार त्यांना रेल्वे सुरक्षा बलाला अडीच वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये सापडलेल्या आणि सध्या साडेपाच वर्षांच्या शुभमविषयी समजलं.


आकोल्यात असल्याची माहिती

त्यानंतर, पोलिसांनी केलेल्या वर्णनानुसार एक मुलगा अकोल्यातील 'उत्कर्ष शिशु गृह'मध्ये असल्याचं समोर माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांना फोटोच्याआधारे त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, एका चिमुरड्याचा अडीच वर्षांनंतर शोध लागल्यामुळं फोटोवरुन ओळख पटवणं खूपचं कठीण झालं होतं. त्यामुळं, अकोला जिल्हा बालकल्याण अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीनं शुभमच्या पालकांना अकोल्याला पाठवून त्याची ओळख पटवून घेण्यात आली. त्यावेळी दोघांनी एकमेकांना ओळखलं आणि अडीच वर्षांपूर्वी हरवलेल्या या लेकाची आपल्या पालकांशी भेट झाली. 



हेही वाचा -

भरतीमुळे हाजीअली दर्ग्याची वेळ बदलली

लैंगिक अत्याचार प्रकरणी दिग्दर्शक विकास बहलला क्लीन चिट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा