Advertisement

आदी गोदरेज, इक्बाल सिंह चहल, उज्ज्वल निकम यांना ‘मुंबई रत्न’ पुरस्कार

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 31 निवडक व्यक्तींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देण्यात आला.

आदी गोदरेज, इक्बाल सिंह चहल, उज्ज्वल निकम यांना ‘मुंबई रत्न’ पुरस्कार
SHARES

गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम आदी मान्यवरांना ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 31 निवडक व्यक्तींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देण्यात आला. फिल्म्स टुडे, नाना नानी फाउंडेशन व एनार समूहातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

यावेळी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे.

राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ञ डॉ गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, युनियन बँकेचे अध्यक्ष राजकिरण राय, डॉ शोमा घोष, आशिष चौहान आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व वेदांत समूहाचे अनिल अगरवाल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा