Advertisement

'संडे स्ट्रिट' उपक्रम मुंबईतल्या 'या' ३ ठिकाणीही राबवणार

इथं देखील नागरिक ३ एप्रिलपासून संडे स्ट्रिट हा उपक्रम राबवला जाणार आहे.

'संडे स्ट्रिट' उपक्रम मुंबईतल्या 'या' ३ ठिकाणीही राबवणार
SHARES

मुंबईचे पोलीस आयुक्त, संजय पांडे यांनी ट्विटरवर घोषणा केली की, रविवार, 3 एप्रिलपासून संडे स्ट्रीट उपक्रम आणखी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये आणखी ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

या मोहिमेला मुंबई पोलीस उपस्थित राहणार आहेत असून तेही यात सहभागी होणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावं, असे आवाहन पांडे यांनी केलं आहे.

रविवारी काही तासांसाठी, मुंबईतील रस्त्यांचा उपयोग अनेक मनोरंजनात्मक क्रियाकलापांसाठी केला जातो ज्यात जॉगिंग, योग, स्केटिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यांचा समावेश आहे.

मुंबईतील पहिली संडे स्ट्रीट संकल्पना २७ मार्च रोजी सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेत या रस्त्यांवरील खालील ठिकाणी राबविण्यात आली:

  • मरीन ड्राइव्ह: दोराभाई टाटा रोड नरिमन पॉइंट
  • वांद्रे: कार्टर रोड
  • गोरेगाव : माइंड स्पेस बॅक रोड
  • डीएन नगर : लोखंडवला मार्ग
  • मुलुंड : तानसा पाइपलाइन
  • विक्रोळी : ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी पूल

तथापि, आता या यादीत आणखी ३ ठिकाणांचा समावेश झाला आहे. आता इथं देखील नागरिक ३ एप्रिलपासून संडे स्ट्रिट हा उपक्रम राबवला जाणार आहे.

  • चेंबूर: चिमणी गार्डन रोड (अलोयसियस सोरेस मार्ग)
  • MHB कॉलनी: आयसी कॉलनी दहिसर पश्चिमेला YCMA गार्डनच्या मागे
  • समता नगर: ठाकूर गाव ईएमपी सर्कल

या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना व्यवसायाचा प्रचार करणे, लाऊडस्पीकर वापरणे, राजकीय किंवा धार्मिक क्रियाकलाप करणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आणि कचरा टाकणे यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.



हेही वाचा

टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत... मुंबई पोलिसांची नवी संकल्पना

'काश्मीर फाइल्स' चित्रपट पहाल तर दुधावर सवलत मिळेल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा