Advertisement

मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय प्रजासत्ताक दिनी पुन्हा खुले होणार

6 कोटी रुपयांच्या जीर्णोद्धारानंतर पुन्हा खुले करण्यात येणार आहे.

मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय प्रजासत्ताक दिनी पुन्हा खुले होणार
SHARES

डॉ. भाऊ दाजी लाड सिटी म्युझियम प्रजासत्ताक दिनी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भायखळ्यातील प्रतिष्ठित संग्रहालयाच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे 6 कोटी खर्च केले आहेत. मुख्यत्वे इमारतीच्या गळतीच्या समस्या दूर करण्यासाठी काम करण्यात आले आहे. 

आम्ही 26 जानेवारी 2025 पर्यंत संग्रहालय पुन्हा लोकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून हे संग्रहालय बंद आहे. जीर्णोद्धार केलेली इमारत मुंबईच्या वारशाचे प्रतिनिधित्व करेल,” ते पुढे म्हणाले.

बॉम्बेमधील पहिली वसाहती इमारत एक संग्रहालय ठेवण्याच्या विशिष्ट हेतूने बांधली गेली आहे. मुंबईची गाथा, नकाशे, पुतळे आणि प्रतिमांसह मूळ कलाकृतींचे घर आहे.

या प्रकल्पाशी निगडित एका  अधिकाऱ्याने मिड-डेला सांगितले की, इमारतीला अनेक ठिकाणी गळती होत आहे. ज्यामुळे कलाकृतींना धोका निर्माण झाला आहे. “आम्ही 167 वर्षे जुन्या इमारतीच्या सौंदर्याला धक्का न लावता  दुरुस्ती केली आहे. हे एक अत्यंत आव्हानात्मक काम होते कारण जीर्णोद्धार करत असताना मूळ रचनेला धक्का सुद्धा लावायचा नव्हता.” अधिका-याने सांगितले.

डॉ. भाऊ दाजी लाड सिटी म्युझियमच्या वेबसाइटनुसार, संस्थेला - पूर्वी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम म्हणून ओळखले जात होते. हे म्युझिअम 1857 मध्ये पहिल्यांदा लोकांसाठी खुले करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1975 रोजी, संग्रहालयाचे नाव डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या नावावर ठेवण्यात आले.


हेही वाचा

मेट्रो 3 लाईनवर Airtel पुरवणार पहिली 5G कनेक्टिव्हिटी सेवा

टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा